
सिंधुदुर्गनगरी: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार, २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.











