
सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्यावतीने ओटवणे येथील चारही शाळांच्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कंपास पेटीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उपस्थित श्री. राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य उत्कर्षां गावकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख तथा ग्रा. सदस्य प्रशांत बुराण, विश्वनाथ बोर्ये, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर आदी मान्यवर हजर होते. चारही शाळांच्या शिक्षकवृंदांकडून मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देताना शाळेतील विधार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्त सामाजिक भान राखत कंपास पेटीचे वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचेही आभार मानले. सावंतवाडी तालुक्यात पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातही विक्रांत सावंत आणि मित्रमंडळ यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.










