हत्तीप्रश्नी पालकमंत्री नितेश राणेंनी निभावलं पालकत्व

मनीष दळवींचा समन्वय होता वाखाणण्याजोगाच
Edited by: संदीप देसाई
Published on: April 09, 2025 16:42 PM
views 588  views

सिंधुदुर्ग : मोर्लेत वन्य हत्ती हल्ल्यात दुर्दैवीरित्या शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यतत्पर पालकत्वाच्या भूमिकेमुळे तब्बल २० वर्षांची हत्ती पकड मोहिमेची मागणी काही तासात पुर्ण झाली आणि ग्रामस्थांचा उद्रेक शांत झाला. दरम्यान या अतिशय भावनिक व जनक्षोभ उद्भवणाऱ्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण समन्वयकाची भूमिका निभावली ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे विश्वासू मनीष दळवी यांनी. हो, म्हणूनच शेतकऱ्याच्या मृत्युनंतर संतप्त झालेले मोर्लेवासीय आणि सारेच हत्तीबाधित यांच्या आक्रमकतेने निर्माण झालेला बाका प्रसंग प्रशासनाला निभावता आला. 

 हत्ती उपद्रवाने गेली 20 ते 22 वर्ष त्रस्त असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित शेतकरी व नागरिक माणसे मेल्यानंतर सरकारला जाग येणार का ? असा सवाल सातत्याने विचारला जातं असताना अखेर तो काळा दिवस उजाडला. मंगळवारी ८ एप्रिलला तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात भल्या पहाटे ७ च्या सुमारास एका ७० वर्षीय शेतकऱ्याला वन्य हत्तीने पायदळी चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी काही क्षणात वाऱ्यासारखी दोडामार्ग तालुक्यात आणि जिल्हाभरात पोहचली. साऱ्यांचाच क्षणभर श्वास रोखला गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून वनाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी या साऱ्यानीच मोर्लेकडे धाव घेतली. मात्र हत्ती हल्ल्यात थेट हक्काच्या माणसाचाच बळी गेल्याने मोर्ले वासियांच्या भावना तीव्र होत्या. प्रशासन, लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते, वनखाते, राजकारणी या साऱ्यांच्याच विरोधात गावकरी आक्रमक झाले होते. एवढा टाहो फोडूनही वनखाते, प्रशासन, आमदार, मंत्री कोणीच का हत्ती पकड मोहिम घडवून आणू शकले नाहीत. माणसे मरायचीच आपण वाट पाहत होता का ? अशा शब्दात किंबहुना याहूनही कठोर शब्दात गावकरी जबाबदार लोकांना खडेबोल सुनावत होते. एकूणच सारी परिस्थिती गंभीर होती. स्थानिक लोकांच्या तीव्र भावना, हत्ती हल्ल्यात बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यानंतर मोर्ले वासियांनी घेतलेला टोकाचा निर्णय, हत्ती पकड मोहिमेचे आदेश आणि त्यानंतर वनखाते आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची गावातून सुटका या अशा परिस्थितीतून त्यावेळी मार्ग काढून बाहेर पडणे आवश्यक होते. अगदी याच वेळी जिल्ह्यातुन मोर्ले गावांत दाखल झालेले पालकमंत्री नितेश राणे यांचे विश्वासू शिलेदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. विदेश दौऱ्यावर असलेलं पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने संपर्कात राहत अगदी सकाळ पासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जे गावकऱ्यांना अपेक्षित होते ते घडवून आणले. कडक ऊन आणि त्यात रेंच चा मोठा प्रॉब्लेम, नागगरिकांच्या भावना, जनतेचा रोष याला अगदी संयमाने सामोरे जात आल्यापासून ते ग्रामस्थांना अपेक्षित किंबहुना येथील हत्तीबाधित यांच्या जनभावना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडली.  त्यामुळे गेले दोन अडीच महिने सातत्याने हत्ती प्रतिबंधक उपयोजना करणे व हत्ती पकड मोहिम राबविणे याबाबत वनविभागाला दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्याने आणि त्यात गंभीर बाब हत्ती हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने पालकमंत्री या नात्याने जबाबदारी घेत राज्यस्तरावर सूत्र हलवत नितेश राणे यांनी जनतेला अपेक्षित हत्ती पकड मोहिमेच्या आदेशाचे पत्र अवघ्या काही तासात शेतकऱ्यांना देण्याचा किमया नितेश राणे यांनी घडवून आणली.  त्यानंतर जनतेचा उद्रेक शांत झाला.

यात पालकमंत्री यांचे शिलेदार म्हणून आणि जनतेत वावरणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मनीष दळवी यांचा आवर्जून उल्लेख करणे आवश्यक आहे. कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होतीच, पण अशा परिस्थितीत या घटनेला सामोरे जातं दु:खात बुडालेला आपतग्रस्त कुटुंबियांना धीर देणे.  जनतेच्या भावनांचा आदर करणे. आपल्या नेतृत्वाला योग्य माहिती देऊन शासनकर्ते व लोकप्रतिनिधी म्हणून जनताभीमुख निर्णय करवून घेणे यात मनीष दळवी यांनी निभावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच..

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मानले खास आभार

मोर्ले येथे हत्ती हल्ल्यात आमच्या शेतकरी बांधवाचा नाहक बळी गेला हि अतिशय वेदनादायी बाब आहे. पण यानंतर तरी प्रशासन आणि वनखाते यांनी हत्ती पकड मोहिमेबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र हा निर्णय होण्यासाठी आणि आदेश निघण्यासाठी शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनांचआक्रमक भूमिका घ्यावी लागली. शेतकऱ्याचा जीव गेल्यावर ज्या निर्णयाने त्यांच्या बलिदानाला न्याय मिळू शकला असता असाच निर्णय अखेर पालकमंत्री यांनी राज्य सरकार आणि वनविभागाचे प्रधान सचिव यांच्याकडून अवघ्या काही तासात करून घेतला. हे सारं ज्यांच्यामुळे जुळून आलं ते नेतृत्व म्हणजे मनीष दळवी होय. सकाळपासून ते हत्ती पकड मोहिमेचे आदेश पत्र शेतकऱ्यांच्या हातात देईपर्यंत मनीष दळवी यांनी पालकमंत्री यांच्याकडे केलेला पाठपुरावा आपण जवळून पाहिला. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांचे तर आम्ही ऋणी आहोतच पण मनीष दळवी यांच्या कार्यतप्तरचे आभार मानावे तेवढे थोडेच अशा शब्दात चेतन चव्हाण यांनी दळवी यांचे आभार मानले.