पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 06, 2025 19:44 PM
views 407  views

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे  शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता  सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद. स्थळ, श्री दत्त मंदिर, माणगाव चे सभागृह ता. सावंतवाडी. सकाळी 11 वाजता जेष्ठ नागरिक मेळावा (सिंधुदुर्ग पोलिस जेष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबरचे उध्दाटन). (स्थळ: कुडाळ) दुपारी 12.30 वाजता कुडाळ येथून शासकीय विश्रामगृह कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना  बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली.) दुपारी 1.20 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी व कणकवली बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली) दुपारी 1.40 वाजता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली.)  दुपारी 2.10 वाजता जिल्हा नियोजन अधिकारी व संबंधित यंत्रणा अधिकारी खर्चाचा आढावा बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली.) दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह कणकवली येथून ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता ओम गणेश निवास्थान, कणकवली येथून भिरवंडेकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता हरिनाम सप्ताह सोहळा स्थळ, रामेश्वर मंदिर, भिरवंडे ता. कणकवली. दुपारी 3.30 वाजता भिरवंडे ता. कणकवली येथून रत्नागिरीकडे प्रयाण.