
सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार 30 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 30 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मनोहर आंतराष्टीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता भाजपा युवा मोर्चाच्या मेळाव्यास उपस्थिती ( स्थळ:- प्रहार भवन, कणकवली) सकाळी 12.30 वाजता अशोक लेलँड शोरुमच्या उद्घाटनास उपस्थिती (श्री दत्तात्रय मोटर्स, कासार्डे ता. कणकवली). दुपारी 2.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 वी व 12 वी मध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मुख्यमंत्री यांचा 100 दिवस सुधारणा कार्यक्रम यशस्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती.(स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस.) दुपारी 3.30 वाजता कोर्ले सांतडी प्रकल्पाच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ओरोस.) सायं. 5 वाजता वाभवे- वैभववाडी नगरपंचायत कार्यालयास भेट (स्थळ:- वैभववाडी जि. सिंधुदुर्ग)