
मंडणगड : मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध प्रभागात मंजुर झालेल्या विकास कामांचे भुमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. १३ मार्च २०२५ रोजी कोंझर येथे विहीरीस संरक्षक भिंत बांधणे निधी पंचवीस लक्ष, मुख्य पाट रस्ता ते जँकवेलकडे जाणार रस्ता खडी व डांबरीकरण करणे पंधर लक्ष, प्रभाग क्रमांक सतरा तुरेवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे दहा लक्ष, एकुण पन्नास लाख रुपयांचे कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, बांधकाम सभापती राजेश्री सापटे, पाणी पुरवठा समिती सभापती सुभाष सापटे, महिला बालकल्याण सभापती समृध्दी शिगवण, नगरसेवक मुकेश तलार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना बोथरे, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकदाम, स.तु. कदम, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, साईराज सावंत, सुधीर हातमकर, दगडू बैकर यांच्यासह नागरीक उपस्थित होते.