देवगड न.पं.च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 02, 2026 10:51 AM
views 71  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ देवगड येथे संपन्न झाला.

यावेळी नाम. नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आम. अजित गोगटे, बाळ खडपे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी गौरी पाटील, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, निवृत्ती उर्फ बुवा तारी, गटनेते शरद ठुकरूल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेवक संतोष तारी, तन्वी चांदोस्कर, प्रणाली माने, रोहन खेडेकर, विशाल मांजरेकर, गणपत गावकर, उषकला केळुस्कर, अन्य भाजप पदाधिकारी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यामध्ये पवनचक्की नजीक वैशिष्टपूर्ण विशेष अनुदान sn2025-26 अंतर्गत नगरपंचायत हद्दीत नमो उद्यानविकसित करणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत नगरपंचायती कडे प्राप्त अत्याधुनिक सक्शन वाहनाचेलोकार्पण सोहळा पार पडला.