एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल 900 रुपयांनी महाग

वडापावसह हॉटेलमध्ये जेवणे महागात पडणार | हॉटेल व्यवसायिकांचे बजेट कोलमडले
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 02, 2026 09:15 AM
views 9  views

एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे व हॉटेल व्यवसायिकांचे बजेट कोलमडले आहे. आधी व्यवसाय सिलेंडर 2103 होते तो आता 3096 रुपये झाला  आहे घरगुती वापरासह हॉटेल आणि रेस्टॉरंट छोट्या व्यवसायावर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा वडापाव आता महाग होणार आहे गॅस दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले असून, याचा परिणाम म्हणून बाहेर जेवणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी जेवणाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, सरकारने दरवाढीचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली जात आहे.