
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेशजी राणे यांच्या माध्यमातून मंजूर मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील नाद ते महाळुंगे हा 3 कि. मी. रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मंजूर झाला.या साठी अंदाजित रक्कम 5 कोटी 50 लाख एवढी रक्कम मंजूर झाली आहे. या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले.यावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर,मंगेश लोके,मिलिंद साटम,सरपंच प्रवीण पाष्टे ,उपसरपंच मंगेश तेली,ग्रा. सदस्य सुरेश गुरव ,मयुरी तांबे,विजय तेली,अण्णा परब,काका बाणे,इंद्रजित आंग्रे,मारुती गराटे,दिलीप मटकर ई. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कित्येक वर्षाची ग्रामस्थांची मागणी पालकमंत्री नाम. नितेशजी राणे यांनी पूर्ण केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.