
सावंतवाडी : शहरामध्ये सालईवाडा भागात नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होणाऱ्या प्लेवर ब्लॉक कामाचे भूमिपूजन आज भाजप शहराध्यक्ष, माजी नगरसेवक सुधीर आडेवडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी आडीवरेकर यांनी आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करत प्लेवर ब्लॉकचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. याबाबत जनतेतून आडीवरेकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी अमित गौंडळकर, नागेश जगताप आदींसह येथील रहिवासी नागरिक उपस्थित होते.