
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या मणेरी येथील मुख्य नळयोजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र व मुख्य नळ योजनेच्या नवीन साठवण टाकीच्या बांधकामचे भूमिपूजन गुरुवारी कसई दोडामार्ग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महायुतीचे दोडामार्ग पदाधिकारी उपस्थित होते.
दोडामार्ग शहरातील वाढती लोकसंख्या व वाढते उद्योगधंदे याचा विचार करता कसई दोडामार्ग नहरपंचायतच्या नळपाणी योजनेच्या पाण्याची दिवसेंदिवस समस्या गंभीर होत चाली होती. भविष्यात पाण्याचा तुटवडा दोडामार्ग शहरात होऊ नये यासाठी आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केल्यानंतर अडीच कोटी रुपयाचा निधी जलशीद्धीकरण केंद्र, व पाणी साठवण टाकी साठी देण्यात आला. मुख्य नळयोजनेच्या जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्राला 1 कोटी 70 लाख आठ हजार दोनशे रुपये तर पाणी साठवन नवीन टाकीच्या बांधकामाला 59 लाख 98 हजार 300 रुपये एवढा भरघोस निधी आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला. त्या कामाचे गुरुवारी सकाळी 11 वाजता कसई दोडामार्ग नगरपंचायतच्यावतीने भूमीपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस शिवसेना तालुक प्रमुख गणेश प्रसाद गवस, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, रामदास मेस्त्री, राजू निंबाळकर, अमर राणे, सुमित म्हाडगूत, विशांत तळवडेकर, नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
विकासासाठी कायम कटीबद्ध : गणेशप्रसाद गवस
भूमीपूजन सोहळ्यात वेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख गवस म्हणाले की, वाढती लोकसंख्या पाहता व शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी द्यावे यासाठी नगरपंचायतने आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार दीपक केसरकरयांनी जलशुद्धीकरण प्रकल्प व साठवण टाकीसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला. महायुती सरकार म्हणून दोडामार्गच्या प्रत्येक विकासाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध राहू.
शहराची समस्या सुटणार : व्यापारी सागर शिरसाट
यावेळी दोडामार्ग शहरातील व्यापारी सागर शिरसाट बोलताना म्हणाले की या नळयोजना व जलशुद्धी करण प्रकल्पामुळे दोडामार्ग शहरात पुरेपूर पाणी उपलब्ध होणार आहे. व्यापारी दुकानदार हॉटेल यांना योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे दोडामार्ग शहरात अजून व्यापार वाढू शकतो असा विश्वास व्यक्त केला.