वजराट येथील मंजूर विकासकामांचे मनिष दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Edited by: दिपेश परब
Published on: April 28, 2026 14:26 PM
views 55  views

वेंगुर्ला : तालुक्यातील वजराट गावात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांची  भूमिपूजने सोमवारी (२७ एप्रिल ) जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

ग्रामपंचायत वजराट मधील इलेक्ट्रिक  २० पोलचे कन्वर्जन करणे साठी ५ लाख रुपये निधी, वजराट परबवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणेसाठी १७ लाख रुपये निधी, वजराट चव्हाटा मंदिर ते पलतड परबवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे ५ लाख, पिंपळगाव उदवगिरीवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे ५ लाख,  तसेच वेंगुर्ला पंचायत समिती सेस फंडातून पिंपळगाव शाळा दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये इत्यादी विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचा शुभारंभ मनीष दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, प्रमुख गावकर सुर्यकांत पुंडलिक परब, वजराट श्री गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव उर्फ ताता परब, वजराट सोसायटी व्हाईस चेअरमन दत्तात्रय उर्फ अण्णा वजराटकर, माजी सरपंच महेश राणे, माजी उपसरपंच नितीन परब, वामन भोसले, प्रवीण कांदे, वसंत परब, माजी सरपंच रमेश राणे, महेश राणे, राजन परब, सोसायटी संचालक सत्यवान सावंत, निवृत्ती घोणे, मंगेश परब, संदीप पेडणेकर, रविंद्र पालयेकर, निवृत्ती घोणे, मेघश्याम परब, मंगेश परब, शेखर परब, मकरंद गोंधळेकर, संजय केरकर, विजयसिंग परब, जयसिंग देसाई, सत्यवान सावंत तसेच वजराट, पिंपळगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.