
देवगड : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवगड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिक यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अबिवाद्न करत साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख काका राऊत, उपतालुका प्रमुख तथा नगरसेवक निवृत्ती (बुवा) तारी, आबा कोरगावकर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर, रोहन खेडेकर, सुधीर तांबे, तालुका महिला आघाडी संघटक हर्षा ठाकुर, महिला शहरप्रमुख स्वप्नाली वाल्मिकी, पडेल विभागप्रमुख संदीप डोळकर, युवासेना विभागप्रमुख बापर्डे फरिद काझी, व शिवसैनिक महेंद्र भुजबळ, प्रवीण कावले, विशाल कोयंडे, बाळा कणेरकर, उदय करंगुटकर, गणेश वाळके, श्रीकांत मल्हार, भालचंद्र शेटगे आदी उपस्थित होते.