वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीनं महामानवाला अभिवादन !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक उत्तुंग, प्रखर बुद्धिमान व्यक्तित्व : प्रसन्ना देसाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 06, 2022 17:06 PM
views 162  views

वेंगुर्ला : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर व जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक उत्तुंग, प्रखर बुद्धिमान, समाज उद्धारक, बहुपैलु व्यक्तीमत्वाचे महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय ज्ञानशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजनितीज्ञ आणि समाजसुधारक होते . भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते . भारतीय संविधानातील त्यांच्या अमुल्य योगदानामुळे त्यांना " भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार " म्हटले जाते , असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांनी केले .

   यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, महीला मोर्चाच्या रसिका मठकर, अरुण ठाकूर , दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग , शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , वासुदेव पांगम , सई चेंदवणकर इत्यादी उपस्थित होते .