पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 21:17 PM
views 153  views

सावंतवाडी  :  सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची 86 वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यानी भुषविले. सावंतवाडी संस्थांनचे राजगुरू राजेंद्र भारती महाराज यावेळी ऊपस्थित होते. 

 तसेच  संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब  सौ शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहसंचालक अॅड.शामराव सावंत ,सदस्य डॉ. सतीश सावंत,श्री जयप्रकाश सावंत, प्रमुख अतिथी  डाॅ.सुरज पंडीत , साठ्ये महाविद्यालय विलेपार्ले, मुंबई , प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, संस्थांनवर प्रेम करणारे  नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

        उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक बापूसाहेब  महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी साठ्ये महाविद्यालय मुंबई आर्किऑलॉजी विभाग प्रमुख डॉ. सुरज पंडीत यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण व त्यामधील संधी व भविष्यामध्ये          व्यवसायभीमुख शिक्षण विद्यार्थ्याना दिले जाणार आहे .याबद्दल माहीती दिली. विद्यार्थ्याना आपले आवडीचे विषय आता घेता येणार आहेत असे  ते  म्हणाले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेतला . यावेळी सेट परीक्षा पास झालेल्या व बारावी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 'मध्ये टॉपर आलेल्या मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

       आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी आवर्जून सांगितले की पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी संस्थानमध्ये त्याकाळी शिक्षणाची दारे सर्वसामान्य लोकांसाठी खुली केली त्यामुळे येथील शेतकरी गरीब कुटुंबातील मुले त्याकाळी शिक्षण घेऊ शकली.महाविद्यालयाची उत्तरोत्तर झालेली प्रगती याची मुहूर्तमेढ बापूसाहेब महाराजांनी त्या काळामध्ये राबवलेल्या शैक्षणिक धोरणांमध्ये रोवली होती. 

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या जीवनावर चिंतन प्रा. माधव भिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ सौ प्रगती नाईक यांनी केले .प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. यु सी पाटील यांनी करून दिला. तर आभार प्रा.डाॅ यु आर पवार यांनी मानले