बाळासाहेब ठाकरे यांना वैभववाडीत अभिवादन!

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आदरांजली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2022 19:33 PM
views 374  views

वैभववाडी : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त तालुका कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.  यावेळी 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे!' अशा जोरदार घोषणा  शिवसैनिकांनी दिल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेचे वैभववाडी तालुका प्रमुख  मंगेश लोके, माजी जिल्हा बँक संचालक  दिगंबर पाटील, माजी सभापती  लक्ष्मण रावराणे, उपतालुका प्रमुख  श्रीराम शिंगरे, लोरे विभाग प्रमुख आणि लोरे गावचे सरपंच  विलास नावळे, लोरे युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, अनिल नराम, पांडुरंग पांचाळ, विलास पावसकर, राजाराम गडकर, आनंद नांदलस्कर, राजेश तावडे, नितेश शेलार, दीपक पवार आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.