धर्मवीर आनंद दिघेंना सावंतवाडी शिवसैनिकांकडून अभिवादन

Edited by: विनायक गावस
Published on: August 26, 2023 15:19 PM
views 63  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी महिला जिल्हा संघटक अॅड. नीता सावंत कविटकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, भारती मोरे, माजी नगरसेविका सपना नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर, विभागप्रमुख पप्पू सावंत, अब्जू सावंत, प्रवीण मुळीक, लाडू जाधव, नाथा हळदणकर, विश्वास घाग, शिवानी पाटकर, ज्योस्ना सुतार, लतिका सिंग, गीता सुकी उपस्थित होते.