
सावंतवाडी : महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने शनिवारी समाज मंदिर सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध महासभेचे जिल्हा चिटणीस संजय पेंडुरकर, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष दिलीप तरंदळेकर, सचिव प्रवीण कदम यांच्यासह सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला विभागाच्या उपाध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर ह्या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर चंद्रशेखर जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केलं. यावेळी संजय तेंडुलकर यांनी महात्मा फुले यांच्या विविध पैलू सांगून शिक्षणाचे महत्त्व सर्वप्रथम त्याने जाणून शिक्षणाचा पाया त्यांनी घातला हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर यांनीही मार्गदर्शन केले व महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेऊया असे आवाहन केले. शेवटी चंद्रशेखर जाधव यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर समता सैनिक दलामार्फत 14 एप्रिल साठी कवायत व संचलनाचा सराव घेण्यात आला यावेळी प्रवीण कदम दिलीप तरंगळेकर व संजय तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले.