
दोडामार्ग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व्दारा आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा नवदुर्गा माध्यमिक विद्यालय, आयी येथे पार पडली. या स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले. तब्बल 10 खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक अनिरूद्ध महेंद्र शेटकर, द्वितीय क्रमांक प्रथमेश प्रकाश कांबळे, 19 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक सेजल संभाजी सावंत , द्वितीय क्रमांक ऋतुजा रघुनाथ पर्येकर, 17 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक चैतन्य मंदार फातर्पेकर, तृतीय क्रमांक भावेश बाबाजी देसाई, 17 वर्षांखालील मुलींच्या गटात व्दितीय क्रमांक आर्या महादेव सावंत, तृतीय क्रमांक आर्या आनंद राठ्ये, 14 वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक श्रेया प्रभाकर राठोड, पाचवा क्रमांक प्रगती दिपक गावडे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष विकास भाई सावंत, उपाध्यक्ष दिनेश नागवेकर, खजिनदार सी एल नाईक, सचिव व्ही बी नाईक, मुख्याध्यापक अरविंद साळगावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूंना बामणीकर सर व पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.