
सावंतवाडी : भाजपाचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याला उदंड प्रतिसाद मिळाला. सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने पुरुषांसाठी ही स्पर्धा होती. आज सकाळी ६ वाजता सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर ही स्पर्धा रंगली. यावेळी भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाला ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.