बालवैज्ञानिक प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ..!

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडेंची उपस्थिती
Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 05:55 AM
views 255  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामने 51 वं राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन 10 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिमखाना मैदान सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलं आहे. या भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते. राज्यभरातील निवडक अशा तब्बल 500 वैज्ञानिक प्रतिकृती या बालवैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी झाली आहेत.

शिक्षण विभाग, इतर संस्थांसह कोकणात शिक्षणाचा ब्रॅण्ड उभं करणाऱ्या भोसले नॉलेज सिटीनं यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. ‌दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वीकारली आहे. सावंतवाडी येथे होणाऱ्या या बालवैज्ञानिक प्रदर्शनास राज्यभरतील मंडळी 

आली  आहेत. राज्यभरातील निवडक पाचशेहून अधिक वैज्ञानिक प्रतिकृती या प्रदर्शनात सहभागी झाली आहेत. विद्यार्थांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच असून मुलांच्या कल्पनाशक्तीला व कौशल्याला वाव मिळणार आहे. जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी प्रदर्शन कालावधीत खुले असून उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला लाभला आहे.