नारूर बिलेवाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकली खडी

निलेश राणेंच्या माध्यमातून रस्ता चिखलमुक्त
Edited by:
Published on: June 12, 2025 19:31 PM
views 66  views

कुडाळ  : नारूर येथील बिलेवाडी शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार होता. याबाबत आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना समजल्यावर या चिखलमय रस्त्यावर तात्काळ खडी टाकण्यात आली.  हा रस्ता चिखल मुक्त करण्याला सुरुवात करण्यात आली.

नारूर मुख्य रस्ता ते बिलेवाडी शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता लवकरच शाळा सुरू होणार आहेत. आणि या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शाळेत जाणार आहे. त्यांना या चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार होता. याबाबत बाबुराव देसाई, दिगंबर गावडे आणि बाबी शिंदे यांनी ही बाब जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या रस्त्यावर तात्काळ खडी टाकण्यात आले. त्यामुळे हा रस्ता चिखल मुक्त करण्यात आला विद्यार्थ्यांशी होणारी गैरसोय दूर करण्यात आली या तात्काळ घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.