गवत्या सापाला सर्पमित्र महेश राऊळ यांनी दिले जीवदान

Edited by: विनायक गावस
Published on: September 06, 2023 15:13 PM
views 131  views

सावंतवाडी : दांडेली येथील चंद्रकांत विष्णु गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात त्यांना हा हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा आशिया खंडात मिळणारा बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत ग्रीन किलबॅक असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावाने ओळखला जातो.त्याला सुखरुपपणे पकडून सर्पमित्र महेश राऊळ यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले.


काल रात्री ११ वाजता दांडेली येथे एकाच्या घरी साप आला असा फोन आला आणि लगेच महेश राऊळ तुळस वरुन दांडेली येथे पोहचले त्यांनी बघितलं तर त्यांना नेहमीपेक्षा वेगळा साप दिसला जो साप तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ नाही. तरीसुद्धा हा जास्त आढळून येत नाही कारण त्याचा रंग हिरवा असल्यामुळे आणि त्याचा अधिवास हा हिरव्या झाडाझुडपात गवतात असल्यामुळे तो जास्त आढळून किंवा दिसून येत नाही.क्वचित तो मानवी वस्तीत आढळून येतो.गवत्या साप कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो.याचे शास्रीय नाव मॅक्रॅापिस्थोडॅान प्लॅंबिकलर असे आहे.

      समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यत हा आढळतो. हा सामान्यत : डोंगराळ भागात राहणारा असला तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो.तो गवत व झुडपांमध्ये असतो पण घरातही येतो गवत्या सापाच्या नराची लांबी सुमारे ६० सेंमी तर मादीची सुमारे ९० सेंमी असते पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा ( उंचवटा )असल्यामुळे ती खरखरीत असते.खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात.दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निधालेली असते.शेपूट लहान असते तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही.मात्र तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय.दरम्यान महेश राऊळ यांनी त्याला सुरक्षित रेक्यू करुन नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे.