सावंतवाडीत आजी-आजोबा दिवस उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: September 11, 2023 16:51 PM
views 195  views

सावंतवाडी : एकत्र कुटुंबात आजी- आजोबा यांना महत्त्वाचे स्थान आहे. आजी-आजोबांचे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी यंदापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा केला जात आहे. त्यातून आपल्या समाजाला एक नवी प्रेरणा मिळावी यासाठी सावंतवाडी एज्युकेशन संचलित कळसुलकर हायस्कूलमध्ये आजी- आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी मुलांबरोबर त्यांचे आजी- आजोबा शाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणमंत्र्यांसह प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत ठाकूर संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै माजी अध्यक्ष राजन पोकळे शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीता सावंत मुख्याध्यापक एन.पी. मानकर संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, मोहन  वाडकर, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, नंदू गावडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई तसेच संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.