
सावंतवाडी : सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी ३० मार्च रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोभा यात्रेचा शुभारंभ संध्याकाळी ५ वाजता राजवाडा येथुन सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी भोसले आणि युवारानी श्रद्धाराजे भोसले यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा गांधी चौक, जयप्रकाश चौककडून पुढे जात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाकडे या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत महिला ढोल पथक, लाठी काठी पथक, लेझीम पथक यांचा समावेश असून टाळ नृत्य, पोवाडा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
या शोभा यात्रेत सावंतवाडी परिसरातील सर्व हिंदू बंधू आणि भगिनीनी पारंपारिक पोशाखात उपस्थित रहावे असे आवाहन आरंभ सखी ग्रुपच्या पल्लवी रेगे, देवता हावळ, संजना देसकर, दर्शना रासम, संगीता शेलटकर आणि नेहा मडगावकर यांनी केले आहे.