RPD च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं शानदार उद्घाटन..!

पंखांना बळ देण्याचं काम 'आरपीडी'नं केलं : अर्चना घारे - परब
Edited by: भगवान शेलटे
Published on: January 05, 2024 19:41 PM
views 238  views

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीच वार्षिक स्नेहसंमेलन, परितोषिक प्रदान समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन आज  राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत,  प्राचार्य जगदीश धोंड,  उपप्राचार्या, डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक प्रल्हाद सावंत आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अर्चना घारे परब यांनी आपल्या जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. आपण या  शाळेची माजी  विद्यार्थिनी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याच सांगत त्यांनी याच मैदानावर खेळले बागडल्याचं सांगितलं. तसेच या संस्थेने पंखांना बळ दिल्याचं सांगितलं. 

ताल द रीदम वार्षिक स्नेहसंमेलनाच उद्घाटन तसेच बक्षिस वितरण, रंगावली प्रदर्शन आणि कला प्रदर्शन याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या अर्चना घारे परब आणि इतर मान्यवराच्या उपस्थितीत झाले. 

विद्यार्थ्यांतील बौद्धिक आणि कलात्मक विकास व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून पाचवी ते बारावीपर्यंतचे तीन गट पाडून आदर्श विद्यार्थी निवडण्यात आले. पाचवी ते सातवी गटातील आदर्श विद्यार्थीनी कु . तन्वी प्रसाद दळवी, कु . आर्यन प्रणव कासार, आठवी ते दहावीमधून श्रेयस श्रीकात तळवणेकर विद्यार्थिनी पूनम गंगाराम नाईक अकरावी बारावीमधून प्रदीप तुकाराम जंगले, आत्माराम कवठणकर आनंद मांजरेकर, सतोषी भिवा , वैष्णवी गोविंद भांगले, तन्वी तुकाराम सावंत यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच कला व क्रिडा क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

"मुलींनी शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे . तसेच विदयार्थ्यांनी पोलीस अधिकारी कलेक्टर होण्याची स्वप्न ", असे आवाहन प्रमुख पाहुण्या अर्चना घारे परब यांनी आपल्या भाषणात केले.

" कुठल्या धर्मात जातीत कुणाच्या पोटी जन्माला यावं हे तुमच्या हातात नाही तरी तुम्ही कर्तृत्वाने आपलं भवितव्य उज्वल करू ", असे उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणातून विकास सावंत यांनी मांडले. या संमेलनासाठी सावंतवाडी दशक्रोशीतील पालक, शिक्षक, पत्रकार, हितचिंतक आणि शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्याचा समारोप उपप्राचार्या प्रा . सुमेधा नाईक यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला .

आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य जगदीश धोंड यांनी हायस्कूल राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर येथील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांचा शैक्षणिक आलेख चढताच ठेवत असल्याच प्राचार्य धोंड यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार यावेळी मांडत संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं.

यावेळी संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, स्कूल कमिटीचे चेअरमन, डॉ. दिनेश नागवेकर, सदस्य अमोल सामंत, सोनाली सावंत, वसुधा मुळीक, सतीश बागवे, च. मु. सावंत, संदीप राणे, माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील, बोडके, सत्कार मूर्ती शैलेश नाईक, शेखर नाईक आदि उपस्थित होते. 

प्रास्ताविक जगदीश धोंड यांनी, अहवाल वाचन उपमुख्याध्यापक प्रल्हाद सावंत यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले. उद्या ६ जानेवारीला दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमांनी याची सांगता होणार आहे.