दोडामार्ग दीपावली शो टाईमचे शानदार उदघाटन

पहिल्याच दिवशी झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत निल बांदेकर तर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत संध्या कांबळे प्रथम
Edited by: संदीप देसाई
Published on: November 11, 2022 19:26 PM
views 174  views

दोडामार्ग : दोडामार्ग येथील वक्रतुंड मित्रमंडळ बाजारपेठ दोडामार्गने यावर्षी आयोजित केलेल्या १५ व्या दीपावली शो टाईमचे दिमाखात उदघाटन झाले. पुढील अजून दोन दिवस हा शो टाईम चालणार असून १२ नोव्हेंबर ला मुख्य प्रोग्राम होणार आहे. १२ नोव्हेंबरला दोडामार्ग आयडॉल ही मुख्य स्पर्धा होणार असून विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांनी हा प्रोग्राम पुरस्कृत केला आहे. मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढकारने हा महोत्सव होत असून पहिल्याच दिवशी झालेल्या फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स स्पर्धेला स्पर्धक व रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. याचं उद्घाटन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते झाले.

   यावेळी मनोज पार्सेकर, प्रकाश सावंत, सुदेश मळीक, नितीन मणेरीकर, विशाल चव्हाण, राजेश फुलारी, गोकुळदास बोंद्रे, विशाल मणेरीकर, सुधीर पनवेलकर, लवू मिरकर, सुमित दळवी आदी उपस्थित होते.


दीपावली शो टाईम मध्ये पहिल्याच दिवशी झालेल्या 12 वर्षाखालील मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेने जबरदस्त रंगत आणली. यावर्षी वक्रत्रूंड मंडळाच्या युवाईंन मोठी मेहनत घेत उपलब्ध करून दिलेली व्यासपीठाचा गोमंतकीय स्पर्धकांबरोबरच तोडीस तोड असा स्थानिक दोडामार्ग व जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठा लाभ उठविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह छत्रपती शिवाजी राजे, शंभू राजे, लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मराठमोळे मावळे, शिवबांचा सच्चा शिलेदार तानाजी अशा एक से एक व्यक्तिरेखा साकारत फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील मुलांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. मंडळाच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केलं. 

पहिल्या दिवशी झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सावंतवाडीच्या  निल बांदेकरने प्रथम क्रमांक पटकाविला. बाकी सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-  द्वितीय - आरोही वेरेकर फोंडा गोआ, तृतीय - प्रज्ञा कुडव म्हापसा, चतुर्थ - विर नाईक ओल्ड गोवा, उत्तेजनार्थ - 

आरव आईर -पिंगुळी कुडाळ

स्वरा मळीक - लाडफे गोवा

स्पृहा दळवी - घोटगे, दोडामार्ग

स्थानिक विजेता - गौरांक कुंदेकर - दोडामार्ग

तर 

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत गोव्यातील संध्या कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय - सोहम जांबरे सावंतवाडी, तृतीय - अरोनिका सांगेलकर गोवा, चतुर्थ - दुर्वा पावसकर, कुडाळ व उत्तेजनार्थ -  आरव आईर - कुडाळ निधी खडपकर - सावंतवाडी, काव्या गावडे - सावंतवाडी

स्थानिक विजेता म्हणून दोडामार्ग येथील आर्या दळवी हिने नंबर पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण भरतनाट्यम अलंकार तुळशीदास आर्लेकर, गौरी पार्सेकर, संदीप गवस, उत्कर्षा मळीक यांनी केलं. तर सूत्रसंचालन शुभम धुरी यांन केलं.

      वक्रत्रूंड मंडळाचे शुभम गावडे, युवराज ऐनापूरकर, रोहित हळदणकर, बाबू माळीक, शिवम फुलारी, समीर रेडकर, राज बोन्द्रे, विग्नेश आसोलकर, अभि एनापुरकर, अनिकेत असोलकर, लक्ष्मण खडपकर, विराज मयेकर, राज गवस यांनी स्पर्धा व दिपावली शो टाईम मोठ्या दिमाखात संपन्न होण्यासाठी मेहनत घेतली.


दोडामार्ग आयडॉल कोण? उद्याचा प्रोग्राम विशेष

१० ते १२ नोव्हेंबर दरम्यान दोडामार्ग मध्ये वक्रत्रूंडचा दीपावली शो टाईम होत असला तरी उद्या १२ नोव्हेंबर ला मुख्य आकर्षण असलेला दोडामार्ग आयडॉल ही स्पर्धा होणार आहे. विशाल फाउंडेशनचे संस्थापक व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हा शो पुरस्कृत केला असून यावेळी कलर्स मराठी वरील सूर नवा ध्यास नवाचे अंतिम टप्यातील सुपरस्टार तृप्ती दामले कुडाळकर व इंडियन आयडॉल फायनालिस्ट व गौरव महाराष्ट्राचा विजेता गणेश मेस्त्री यांची उपस्थिती प्रमुख आकर्षण असल्याने व १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर वक्रत्रूंड यावर्षी प्रथमच खुल्या स्टेजवर हा प्रोग्राम घेत असल्याने केवळ दोडामार्ग शहरच नव्हे तर संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे.