ओटवणेतील जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे थाटात उद्घाटन

दहा भजन मंडळांचा सहभाग
Edited by: विनायक गावस
Published on: September 03, 2023 20:09 PM
views 75  views

सावंतवाडी : ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे उद्द्घाटन रविवारी सायंकाळी थाटात करण्यात आले. ओटवणे गावातील या प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सरपंच आत्माराम गावकर, नंदू शिरोडकर, पपू सावंत, उमेश गावकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, सुजित कोरगावकर, बंड्या केळकर, अण्णा मळेकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, सोनू दळवी, कृष्णा  देवळी, गुरू कोटकर, संजू कविटकर, मंगेश चिले, महेश परब, बाळकृष्ण भगत,  मिलिंद म्हापसेकर, गुंडू जाधव, रमेश गावकर, परीक्षक कृष्णा राऊळ, आनंद मोरये, स्वप्निल म्हापसेकर, विठू गावकर, विठ्ठल गावकर, समिक्षा गावकर, मनाली गावकर, राजाराम वर्णेकर, तुकाराम गावकर, एकनाथ गावकर, बाळा गावकर, बबलू गावकर , बाबा मळेकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी राजन पोकळे , दाजी गावकर, नारायण राणे, राजाराम वर्णेकर, कृष्णा राऊळ, आनंद मोरये, कृष्णा देवळी, बाळा गावकर, रमेश गावकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चव्हाण तर आभार रमेश गावकर यांनी मानले. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सातुळी येथील

श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ ( बुवा अमित परब ) आणि वेंगुर्ले येथील श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ वेंगुर्ले ( बुवा विशाल घोगळे ) यांच्या सुश्राव्य भजनाचा भजन रसिकानी लाभ घेतला. स्पर्धेतील उर्वरित भजन मंडळांची  सायंकाळी ६:३० वाजता श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पाडलोस ( बुवा अजित गावडे ), सायंकाळी ७:३० निरवडे येथील साटम महाराज प्रासादीक भजन मंडळ ( बुवा नरेंद्र बोद्रे ), रात्री ८:३० वाजता श्री देव सावंत वस प्रासादीक भजन मंडळ इन्सुली ( बुवा वैभव राणे ), रात्री ९:३० वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ कलंबिस्त ( बुवा संतोष धर्णे ) रात्री १०:३० वाजता विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ आंदुर्ले ( बुवा अथर्व होडावडेकर ), रात्री ११:३० वाजता प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादीक भजन मंडळ कुडाळ ( बुवा राजेश गुरव ), रात्री १२:३० वाजता सनामदेव प्रासादीक भजन मंडळ सांगेली ( बुवा खेमराज सनाम ), मध्यरात्री १:३० वाजता श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी ( बुवा रूपेश यमकर ) यांचं भजन होणार आहे.