चाचा नेहरू बाल महोत्सवाचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन !

स्पर्धेत बालगृहातील मुलांना अनेक खेळांच्या संधी उपलब्ध होणार : जिल्हाधिकारी
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 08, 2022 17:58 PM
views 166  views

सिंधुदुर्गनगरी : खेळाडुंनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह यांच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आलेला आहे. या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आज झाले. 

सध्या जागतिकस्तरावरील फुटबॉलच्या स्पर्धा सुरु आहेत. यास्पर्धेत अनेक देशांनी सहभाग घेतला आहे. यामधील काही देश अत्यंत पुढारलेले तर काही देश मागासलेले आहेत.पण खेळामध्ये जो जिंकतो तोच देश विश्वविजेता ठरतो,असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोरोनामुळे गेली दोन वर्षे या स्पर्धा होवू शकल्या नाहीत. आता  तीन दिवस सुरु राहणाऱ्या या स्पर्धेत बालगृहातील मुलांना अनेक खेळांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सामान्य मुलांबरोबर बालगृहातील मुलांचा आनंद व्दिगुणीत होईल, असे सांगून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडुंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.