'अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स 'चं ग्रॅण्ड ओपनिंग

सिंधुदुर्गतील युवकांसाठी आयटी सेक्टरचा मार्ग मोकळा : दीपक केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: March 24, 2024 14:03 PM
views 276  views

सावंतवाडी : माजगाव उद्यमनगर येथे प्रथमच 'आयटी ' चा स्टार्ट अप 'अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स 'च्या माध्यमातून करण्यात आला. याच 'ग्रँड ओपनिंग' शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,  श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ), भिकाजी देऊ कानसे, माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसू यांनी एकत्रित येत नवीन पाऊल टाकलं असून यामुळे सिंधुदुर्गतील युवकांसाठी आयटी सेक्टरचा मार्ग मोकळा झाला आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

दीपक केसरकर म्हणाले, अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसू यांनी एकत्रित येत नवीन पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आयटी सेक्टरचा मार्ग सिंधुदुर्गतील युवकांसाठी मोकळा झाला आहे. बीपीओस जगभरात असतात. एका देशातून दुसऱ्या देशास सेवा देण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व व कॉम्प्युटर हाताळणी करता येणं आवश्यक असतं. एखाद्यावेळेस तक्रारीसाठी येणारा फोन अमेरिका, युरोप आदी भागातून असू शकतो व उत्तर देणारा मुलगा हा भारतात बसलेला असू असतो. भारतातील युवाशक्ती नवी दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने महत्वाच असं पाऊल कोरगावकर व कानसे कुटुंबान टाकलं असून या रोपट्याच रूपांतर वटवृक्षात होवो अशा सदिच्छा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून या कंपनीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांचे वडील श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ), गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांचे वडील भिकाजी कानसे, सावंतवाडीच्या माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर, अन्नपूर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे, प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगांवकर, दत्तप्रसाद कोरगांवकर, व्यंकटेश शेट कोरगावकर,अखिलेश कोरगांवकर आदी उपस्थित होते. 


यावेळी रोजगारासाठी आमची मुलं शेकडो एकर जमीन सोडून  दहा बाय दहाच्या खोलीत रोजगारासाठी राहतात. त्यामुळे भुमिपुत्रांना रोजगार देण्याचा प्रयत्न अन्नपूर्णा टेक सोर्स व गो सोर्स'घ्या माध्यमातून करत आहोत. दहा हजार युवक युवतींना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे असं मत सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले. तर माझा जन्म, शिक्षण सावंतवाडी झालं. नोकरीसाठी मी मुंबईत गेलो. त्यामुळे रोजगारासाठी येथील मुलांना काय करावं लागतं याची जाणीव होती. यातूनच येथील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून प्रयत्न केला. जिल्ह्यातील गरजूंनी या संधीचा फायदा घ्यावा अस आश्वासन गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांनी केल. यावेळी माजी नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, अजय सावंत,  अमित कामत, ओंकार कलवडे, विकास गोवेकर, श्रीकृष्ण काणेकर, श्री. भाट, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा नेत्या अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहत कोरगावर व कानसे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.