सरकारी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा !

...अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा
Edited by: भरत केसरकर
Published on: November 08, 2023 15:16 PM
views 305  views

सिंधुदुर्ग : राज्य सरकारी आणि निम सरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, समन्वय समितीने आज ओरोस रवळनाथ मंदिर येथून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जुनी पेन्शन चालू करा, आठव्या वेतन आयोगाची समिती गठीत करा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, खासगीकरण आणी कंत्राटी करण रद्द करणे,१०० टक्के नोकर भरती करणे, पदोन्नती देणे यासह विविध मागणीसाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला. हे राज्यव्यापी आंदोलन शासनाविरोधात असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले.आपल्या कुटुंबासहित हे राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १४ डिसेंबर पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.यावेळी शिक्षक समितीचे राज्याचे सरचिटणीस  तथाराज्य कर्मचारी जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, राजन वालावलकर, सचिन माने, सखाराम सकपाळ, नारायण नाईक, सचिन मदने, किशोर कदम,पसंजय पेंडुरकर, संजय वेतुरेकर, संजय पवार, राजन वालावलकर, चिदानंद कोळी, सचिन माने, दादा जांभवडेकर,प्रकाश दळवी, के.टी.चव्हाण,राजाराम कविटकर, राजेश चव्हाण, प्रकाश तेडोलकर, सोनाली काटकर, गिरीष गोसावी, अजय शिंदे, विजय मयेकर, अशोक काळे, आनंद राठये यासह अनेक घटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकारांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.अप्पर जिल्हाधिकारी यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .यावेळी जिल्हाधिकारी परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.