नितेश राणेंच्या प्रचाराचा कासार्डेत भव्य शुभारंभ

Edited by:
Published on: November 11, 2024 19:53 PM
views 93  views

कणकवली : तालुक्यातील कासार्डे येथे भाजप महायुतीच्या वतीने शेकोडो ग्रामस्थ श्री महालक्ष्मी मंदिरात जमत भाजपचे उमेदवार आम. नितेश राणे याच्या प्रचाराचा शुभारंभ पारंपरिक पध्दतीने ग-हाणे व श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळेस आम.नितेश राणे यानी कासार्डे गावात केलेली विकासकामे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कासार्डे विभागातून फार मोठे मताधिक्य आमदार नितेश राणे यांना मिळवून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी कणकवली भाजपा मंडलध्यक्ष दिलीप तळेकर,शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, सुप्रिया पाताडे, माजी सभापती प्रकाश पारकर,भाजपा युवा तालुका मोर्चा अध्यक्ष आण्णा खाडये,सरपंच निशा नकाशे,उपसरपंच गणेश पाताडे, माजी सरपंच संतोष पारकर,शारदा आंबेरकर, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, सोसायटी चेअरमन दीपक सावंत, श्रीरंग पाताडे, ग्रा.पं सदस्य मिलिंद पाताडे, विजय राणे,बाळा जोशी,अभी धुमाळ,संजय नकाशे,पपी पाताडे,संदेश सावंत, नारायण घाडी, संजय पाताडे,रविंद्र पाताडे,प्रणिल शेटये,बाबल्या कदम, पांडुरंग शेटये, सत्यवान आयरे, निळकंठ पाटील,रविंद्र गणपत पाताडे, पुंडलिक पाताडे, शांताराम जाधव,जीजी पाताडे, सदानंद पाताडे,दया पाताडे,पप्या लाड,अशोक पांचाळ, संतोष सावंत,  रविंद्र पांचाळ, प्रमोद शेटये, भालचंद्र पाताडे,संतोष कानडे, सहदेव म्हस्के, रविंद्र म्हस्के,उदय साटम, संदिप केसरकर, मंगेश खाडये, कोकाटे,शरद शेलार, सत्यवान आयरे, विजय भोगले,बाबू भोगले, तळेरे माजी उपसरपंच दिनेश मुद्रस,जयवंत तोरसकर आदी उपस्थित होते. 

यावेळेस शेकडो भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी कासार्डे गावातून ९५ टक्के मतदान देण्याचा निर्धार करून उमेदवार नितेश राणे याना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा एकमताने निर्धार करण्यात आला. यावेळेस प्रकाश पारकर, संजय देसाई,दिलीप तळेकर यानी मार्गदर्शन करून घरोघरी प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वात कमी मतदान कासार्डेतून कसे होईल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.