
सावंतवाडी : श्री. लक्ष्मण क्लासेस आणि सभागृह याचे उद्घाटन इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच क्लासच्या लोगोचे उद्घाटन कथ्थक आणि भरतनाट्यम् विशारद कविता राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर व माजी भाजप अध्यक्ष संजू शिरोडकर यांच्या हस्ते झाले मे. श्री लक्ष्मण क्लोसस मध्ये रांगोळी मेहंदी, डान्स व सुम्बा क्लासेस घेण्यात येणार आहेत. रांगोळी व मेहंदी - सलाउद्दीन तहसिलदार डान्स विशाल पवार झुम्बा शिवानी तुवेकर हे प्रशिक्षक नेमण्यात आले आहे. संचालिका - मीना किशन प्रो. मीना गावडे यांनी उद्घाटनावेळी जाहीर केले.