वैश्यवाणी समाज कमिटी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य दिव्य शोभायात्रा

शतक महोत्सवी वर्षाच औचित्य | सावंतवाडीत निनादला ढोल - ताशांचा गजर
Edited by: विनायक गांवस
Published on: February 11, 2023 19:18 PM
views 201  views

सावंतवाडी : वैश्यवाणी समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्यावतीने शतक महोत्सवी वर्षाच औचित्य साधून सावंतवाडी शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सर्वेश भिसे कणकवली महिला आणि पुरुष यांच्या ढोल पथक व नेरुर येथील चित्ररथांनी लक्ष वेधल.


वैश्यवाणी समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५ वा वधू-वर मेळावा रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील वैश्य भवन हॉलमध्ये संपन्न होत आहे. यावेळी वैश्य समाज बांधव तथा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्यावतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.


यावेळी कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, कोकण रत्न उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसुरकर व वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर  वैश्य समाजाच्या माध्यमातून शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.


( सर्व छायाचित्रे - अनिल भिसे )


या शोभा यात्रेत सर्वेश भिसे कणकवली महिला आणि पुरुष यांच्या ढोल पथक व नेरुर येथील चित्ररथांनी लक्ष वेधल. यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे, तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, अँड. पुष्पलता कोरगावकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बाळासाहेब बोर्डेकर, आबा केसरकर, गजानन नाटेकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, गितेश पोकळे, साक्षी वंजारी, समिर वंजारी, किर्ती बोंद्रे,  सलील वंजारी, सुरेश भोगटे, संतोष गांवस, अरूण भिसे, उमेश कोरगावकर, राकेश नेवगी, कल्पना बांदेकर, स्वप्ना नाटेकर, अनिल भिसे,अण्णा म्हापसेकर, श्री. मुळीक, श्री. नार्वेकर आदींसह मोठ्या संख्येने वैश्य बांधव उपस्थित होते.