
सावंतवाडी : ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्थक फौंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, दिनांक ११ मे २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत सावंतवाडी येथील एस. टी. स्टॅंडसमोरील काझी शहाबुद्दीन हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात GMC बांबोळी रक्तपेढी रक्तसंकलन करणार असून, आपल्या जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी हे रक्त उपयुक्त ठरणार आहे. संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस आणि सार्थक फौंडेशनचे संचालक सुदेश नार्वेकर यांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी (जवळपास १०० ते १२५ पेक्षा अधिक) या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे नम्र आवाहन केले आहे.
याव्यतिरिक्त, याच ठिकाणी वयस्कर लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ घेण्याचे विनंतीपूर्वक आवाहन केले आहे.