कुडाळ राममय !

वैभव नाईकांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 20, 2024 09:20 AM
views 459  views

कुडाळ : बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्व से कहो हम हिंदू है या घोषणेतून झाली आणि याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे. आणि अयोध्येत राम होत आहे याचा आम्हाला आनंद आहे असे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगतले यावेळी आमदर वैभव नाईक यांनी बोलताना बाबरी पाडण्यासाठी कार सेवकांनी जी मेहनत घेतली होती व कार सेवक जे पुढे होते त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे असे आमदार वैभव नाईक यानी सांगीतले 


आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीने अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत स्वतः आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसिंग सावंत, युवा सेना कोकण सचिव मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, श्रुती व‌र्दम , श्रेया गवंडे, ज्योती जळवी, यांच्यासह पदाधिकारी स्नेहा दळवी, बबन बोभाटे, राजन नाईक, सचिन काळप, राजू गवंडे, गुरु गडकर, बंड्या कोरगावकर, बाबी गुरव, धीरेंद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री प्रभू राम, देवी सीता, लक्ष्मण, व हनुमान यांच्या वेशभूषेत असलेल्या कलाकारांमुळे तसेच डीजे वरील श्री प्रभू रामांच्या गाण्यांमुळे कुडाळ शहरातील वातावरण राममय झाले आहे.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कुडाळ येथील पक्ष कडून या बाईक राहिलेला सुरुवात करण्यात आली ही  बाईक रॅली पिंगळी म्हापसेकर तिठा मार्गे कुडाळ बाजार पेठ मार्गे ही बाईक रॅली मासळी बाजार मार्गे गुलमोहर बस स्टॉप नजीक असलेल्या राम मंदिरामध्ये आरती करून या रॅलीची सांगता करण्यात आली.


यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर नाशिक येथील काळाराम मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महारथीचे आयोजन करण्यात आले आहे या आरतीसाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांसह आपण सहभागी होणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.