ग्रामसेवक तृप्ती राणे यांचा सत्कार

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 05, 2023 13:08 PM
views 199  views

सावंतवाडी : न्हावेली ग्रामसेवक तृप्ती राणे यांच्या बदली निमित्त तसेच त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल  त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी १० व १२ पास विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला. तसेच यावेळी ओम गणेश ग्रामसंघाच्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी व्यासपीठावर मदन नाईक, सखाराम नाईक, दिगंबर नाईक, आनंद नाईक, दादा वेंगुर्लेकर, कांता पार्सेकर, मोहन नाईक, गंगाराम नेमन, सुशील नागवेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, सागर जाधव आणि स्नेहा  पार्सेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम नाईक तर प्रास्ताविक शरदचंद्र मोहिते यांनी केली.