यशवंतगडच्या तटबंदीला लागून सुरू असलेल्या बांधकामाला ग्रा. पं. ची परवानगी नाही : रामसिंग राणे

संबंधितांना बांधकाम थांबवण्याची नोटीस
Edited by: दिपेश परब
Published on: February 14, 2023 12:05 PM
views 372  views

वेंगुर्ला: रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यशवंत गडाच्या तटबंदीला लागून होत असलेल्या बांधकामाला रेडी ग्रामपंचायतने कोणतीही परवानगी दिली नसून ते बांधकाम थांबवण्यात यावे अशी नोटीस संबंधितांना दिली असल्याची प्रतिक्रिया रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी दिली आहे. 

   दरम्यान रेडी यशवंत गड संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे. गडावर होणारे विविध उपक्रम, शिवजयंती उत्सव यामध्ये शिवप्रेमी यांच्यासोबतच रेडी ग्रामपंचायतचा सुद्धा सहभाग असतो. हा ऐतिहासिक ठेवा योग्य रीतीने जपला जावा यासाठी ग्रामपंचायत मार्फत सुद्धा प्रयत्न केले जात आहे. यामुळे कोणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतवर आरोप करू नये. ह्या बांधकामाला कोणतीही परवानगी ग्रा.प. मार्फत दिली गेली नाही. ३०/०३/२०२२ च्या मासिक मिटिंग मध्ये ज्यावेळी या बांधकाम बाबत अर्ज आला. त्यावेळी याची तक्रार असल्याकारणाने याठिकाणी अगोदर संरक्षक भिंत घालून द्यावी व संबंधित अर्ज पुढील मिटिंग मध्ये सर्व वैध कागदपत्रे असल्यास निर्णय घेण्यासाठी ठेवावा असा ठराव झाला होता. पण पुढील मिटिंगला हा विषय आला नाही आणि ग्रामपंच्यात कडून कुठचीच परवानगी दिली नाही. काहीजण हेतू पुरस्कर ग्रामपंच्यातला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बांधकामबाबत पुरातत्व विभागामार्फत तहसीलदार व पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती सरपंच रामसिंग राणे यांना दिली आहे.