ग्रामिण डाक सेवक संघटनेचं 'या' कारणासाठी धरणे आंदोलन

Edited by: भरत केसरकर
Published on: August 10, 2023 20:55 PM
views 153  views

सिंधुदुर्ग : आॅल इंडिया ग्रामिण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन आज दुपारी तीन ते पाच या वेळेत ओरोस येथील डाक अधिक्षक यांच्या विभागीय कार्यालयासमोर करण्यात आले.

पाच लाखाची ग्रॅच्युइटी मिळणे, पाच लाख ग्रुपवीमा मिळणे, नियमित कर्मचार्‍याप्रमाणे आठ तासाचे वेतन मिळणे आणी आठ तासांची कार्यप्रणाली करणे,180 दिवसांची  भरपगारी रजा रोखीने मिळणे,12:24:36 ची बढती मिळणे अशा विविध मागण्यांसाठी हे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी वर्गाने सहभागी घेतला होता.यावेळी घोषणांनी डाक घर परिसर दुमदुमून गेला होता.या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संतोष विष्णू हरियाण आणी सचिव तुकाराम बाळकृष्ण गावडे यांनी सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार टीका केली.आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनस्तरावर एक निवेदन कर्मचारी वर्गाकडून देण्यात आले.हे आंदोलन आॅल इंडिया ग्रामिण डाक संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष हरयाण आणी आॅल इंडिया ग्रामिण डाक संघटनेचे  सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे सचिव तुकाराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.