ग्रामसेवक धमकीप्रकरण ; उपसरपंचांसह सदस्यांविरोधात गुन्हा दाखल !

Edited by: मालवण प्रतिनिधी
Published on: May 01, 2024 12:19 PM
views 1194  views

मालवण : ग्रामसेवकास धक्काबुक्की व मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, ग्राप सदस्य संपदा प्रभू, संजना शेलटकर, नंदा बावकर व निखिल नेमळेकर सर्व रा. कोळंब यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 332, 504, 506, 34  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत कोळब कार्यालयात ही घटना घडली असून याबाबत तक्रार कोळंब ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रकाश विठ्ठल सुतार रा.त्रिंबक आरेकर वाडी यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. 

ग्रामसेवक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शासकीय काम  करीत असताना विजय भिवा नेमळेकर, संपदा समीर प्रभू, संजना संदीप शेलटकर, नंदा बापू बावकर यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत विकास कामाच्या मुद्द्याची माहिती आताच्या आता द्या असे कारण काढून शासकीय कामात अडथळा केला. ढकला बुकल करून मुका मार दिला.  तसेच निखिल विजय नेमळेकर याने फिर्यादी यांना बघून घेईन अशी धमकी दिली. अशी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यशवंते अधिक तपास करत आहेत.