डांबरेतील उबाठाचे ग्रा.पं. सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश

उ.भा.ठा गटाचे भाजपा इन्कमिंग सुरू,सलग अकराव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच
Edited by:
Published on: April 21, 2024 06:06 AM
views 263  views

कणकवली : तालुक्यातील डांबरे गावातील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव,यांनी आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून डांबरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. 

उपस्थित मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच बबलू सावंत, डांबरे सरपंच किरण कानडे, ग्रा.स‌. संतोष मेजरी, उपसरपंच सागर साटम, संदीप साटम, सुमित मेजारी, प्रथमेश दळवी, आदि भाजप उपस्थित होते.