ग्रामपंचायत सार्वत्रिक - पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 03, 2023 19:19 PM
views 333  views

कुडाळ : ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सदस्य पदास व थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणाली द्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 सार्वत्रिक व 52 पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे त्या 24 ग्रामपंचायत क्षेत्र मर्यादित आचारसंहिता जाहीर झाली आहे.