ग्रामपंचायत माजगांव ग्रामपंचायत आयोजित 'बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षण' कोर्सचा समारोप

Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2023 20:19 PM
views 90  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत माजगांव ग्रामपंचायतीकडून यांजकडून आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसाच्या " बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षण" या ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचा आज ०६ जून २०२३ रोजी समारोप करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक सौ. नम्रता शिरोडकर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सरपंच सौ. अर्चना सावंत यांनी मुलींना व महिलांना आजच्या युगात आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वत:चा व्यवसाय करण्याकरिता असे उपक्रम ग्रा.पं माजगाव मार्फत यापुढेही घेत राहू असे सांगितले. यावेळी  उपसरपंच, श्री. संतोष वेजरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. गिता कासार, श्री. संजय कानसे, श्री. अशोक धुरी,सौ. विशाखा जाधव, सौ. उर्मिला मोर्ये,सौ. मधू कुंभार, सौ. माधवी भोगण, सौ. पूजा गावडे, कु. शितल भोगणे, कु. प्रज्ञा भोगण, श्री. ज्ञानेश्वर सावंत इ. मान्यवर उपस्थित होते.