
सावंतवाडी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आर. पी. डी. हायस्कुल येथे काँग्रेस, राष्ट्रवादी- काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायती व इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्याचे निश्चित करण्यात आले. निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडलेल्या उमेदवारांबाब निश्चिती करण्यात आली. जास्तीत जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आणण्याचे यावेळी ठरवण्यात आले. ही सभा समन्वय समितिचे प्रमुख इर्षाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी राष्ट्रवादीच्या सौ - अर्चनाताई घारे-परब, कॉँग्रेस पक्षाचे विकास सावंत, दिलीप नार्वेकर, शिवसेनेचे बाळा गावडे, चंद्रकांत कासार, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगलेकर, मायकल डिसोजा, चंद्रशेखर जोशी, रविंद्र म्हापसेकर आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.