
कणकवली : ग्रामपंचायत निवडणुक ऑनलाइन अर्ज सादर करताना साईट स्लो असणे, सर्व्हर डाऊन असणे वारंवार ऑनलाईन साईडला एरर येणे या कारणांमुळे इच्छुक उमेदवारांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.एक नामनिर्देशन दाखल करण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे. या संदर्भात काही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ऑफलाइन पद्धतीने फॉर्म स्वीकारण्याची मागणी केली आहे त्या अनुषंगाने तातडीने तहसीलदार आर जे पवार यांनी वरिष्ठ निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क करून ऑनलाईन मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सांगितले आहेत.
आणि सध्याच्या घडीला आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिल्याने ऑफलाईनच उमेदवारी अर्ज भरून घ्या अशी मागणी करत आहेत