
सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आता हे अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे अर्ज हे सावंतवाडी भाजप संपर्क कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांना अर्ज हवे असल्यास भाजप कार्यालयाला भेट देण्याचं आवाहन भाजपचे नेते महेश सारंग यांनी केल आहे.