
दोडामार्ग : दोडामार्ग शिवसेना कार्यालयामध्ये दोडामार्ग महिला पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बैठक संपन्न झाली. यावेळी सर्वांनी शिंदे सरकारने हाती घेतलेला शासन आपल्या दारी उपक्रम घरोघरी पोहचवा असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक सौ. नीता कविटकर यांनी केल.
यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस् ,महिला तालुका प्रमुख सौ. चेतना गडेकर, उप. जिल्हासंघटक मनीषा गवस, सासोली विभाग प्रमुख सान्वी गवस, उपतालुका प्रमुख पूजा देसाई , उपशहर प्रमुख राधिका गडेकर, कोनाळ विभाग प्रमुख लक्ष्मी करमळकर, आवाडे शाखाप्रमुख सफोरा शेख, गिरोडे शाखाप्रमुख अनिता गवस , भेडशी शाखाप्रमुख शेफाली टोपले, उप. तालुका प्रमुख बाबाजी देसाई, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्री, कार्यालय प्रमुख गुरूदास सावंत व सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी गावो गावी अजून मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवीन सभासंद नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.