ही संधी सोडू नका, फक्त १५ दिवस शिल्लक !

महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया सुरु
Edited by: विनायक गांवस
Published on: January 30, 2023 12:07 PM
views 2438  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी,राज्य कर निरिक्षक, पोलीस उप निरिक्षक, दुय्यम निबंधक,दुय्यम निरिक्षक ,तांत्रिक सहाय्यक , कर सहाय्यक , लिपिक -टंकलेखक अशा अनेक पदांसाठी भरती करणार आहेत.


  इच्छुक आणि पात्र उमेदवारांची सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोफत अर्ज भरून देण्याची व्यवस्था यशवंतराव चव्हाण सेंटर, सावंतवाडी याठिकाणी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सुरु झालेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येऊन तसेच फक्त परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज दाखल करून नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले आहे. 14 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख असल्याने लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करून घ्यावा. नोंदणी केलेल्या उमेदवारांना मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या https://mpsc.gov.in किंवा https://mpsconline.gov.in वेबसाईटवर तसेच 9850063006 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही या वेळी सौ अर्चना घारे यांनी सांगितले.