देवगड बंदर जेटी इथं नारळी पौर्णिमेचा शासकीय कार्यक्रम उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 30, 2023 20:23 PM
views 243  views

देवगड : देवगड बंदर जेटी येथे नारळी पौर्णिमेचा शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्साहात  संपन्न झाला. या वेळी विधिवत पुजनाने सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. या प्रसंगी महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर ,पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे ,पतन विभाग अधिकारी विजयकुमार स्वामी, मत्स्यव्यवसाय विभाग अधिकारी आनंत दातार,श्री खुडे ,कस्टम अधिकारी किशोर नाबर,सागर सुरक्षा रक्षक संदेश नारकर,तेजस धुरत,गौरव खानविलकर,सुपरवायझर श्री चोपडेकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा,पोलीस हवालदार राजन जाधव,अमित हळदणकर,पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील,विशाल वैजल,शिवराम निकम ,उल्हास मणचेकर सतीश खानविलकर,राजेश निकम,गुरुनाथ वाडेकर अरुण लाड,संतोष भुजे,तसेच मच्छिमार बांधव,व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होता.