
देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे येथे २२ मार्च सायंकाळी ५ वाजता.सौ कमलाबाई वा. पाटणकर शाळा नं १,दाभोळे, येथे संतोष मयेकर यांच्या संयोजनातून शासकीय निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर तिमिरातुनी तेजाकडेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यवान यशवंत रेडकर कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमाशुल्क विभाग मुंबई (भारत सरकार) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
अधिक माहिती साठी या क्रमांकावर 9969657820 संपर्क करावा यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही, वही व पेन सोबत असू द्यावे, याची विशेष नोंद घ्यावी.असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.